शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हनीप्रीतचा मुक्काम तुरुंगातच पंचकुला जिल्हा न्यायालयाने केली न्यायालयीन कोठडीत सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 17:16 IST

गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या आणि राम रहिमला अटक करण्यात आल्यानंतर सध्या चौकशी सुरू असलेल्या हनीप्रीत इन्सा हिची पंचकुला जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली

चंदिगड -  गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या आणि राम रहिमला अटक करण्यात आल्यानंतर सध्या चौकशी सुरू असलेल्या हनीप्रीत इन्सा हिची पंचकुला जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हनीप्रीत हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हनिप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कोर हिला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. हिंसाचार प्रकरणी आरोप झाल्यानंतर सुमारे महिनाभर पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर हनिप्रीत हिने गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून बाबा राम रहिम आणि बाबाला अटक झाल्यानंतर हरयाणामध्ये उफाळलेल्या हिंसाचाराप्रकरणी तिची कसून चौकशी सुरू होती.  मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली. राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते. 25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरयाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या सर्व घडामोडींनंतर हनीप्रीत गायब झाली. तिच्यासह डे-यातील काही सदस्यांवर हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मागच्या आठवडयात दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचीही चर्चा होती. 

टॅग्स :Honeypreet Insanहनीप्रीत इंन्साDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाCourtन्यायालयCrimeगुन्हा