पान : ३ थोडक्यात
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30
चेअरपदी शाम जाधव

पान : ३ थोडक्यात
च अरपदी शाम जाधवकन्नड : अंधानेर विविध कार्यकारी सेवा विकास संस्थेच्या चेअरमनपदी शाम जाधव, तर व्हाईस चेअरमनपदी देवीदास राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अंजली वाघमारे यांनी काम पाहिले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.रास्ता रोकोफुलंब्री : सांजूळ येथील मयत दीपक गायकवाड याच्या हत्येचा तपास लावण्यात यावा, आदिवासी भिल्ल समाजाला जात प्रमाणपत्र देताना अडवणूक करण्यात येऊ नये, गायरान जमीन कसणार्या समाजाला सातबारे देण्यात यावेत, अशा मागण्यांसंदर्भात फुलंब्री टी पॉइंटवर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय सुरासे यांनी सांगितले.सप्ताहाची सांगताशिऊर : येथील संत तुकाराम बीजनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. गंगाधर महाराज कवडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून झाली. यावेळी सात दिवस ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात यांच्या पवित्र वाणीतून रामायण कथेचे वाचन झाले. यासाठीही हजारो भाविक या ज्ञानार्जनासाठी उपस्थित होते.काशीनाथ श्रीखंडे यांची निवडसोयगाव : येथील भास्कर काशीनाथ श्रीखंडे यांची लोक जनशक्ती पार्टीच्या सोयगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष सलीमभाई खामगावकर यांनी नियुक्तीपत्र दिले. या निवडीचे विजय निकम, संजय मिसाळ, रवींद्र काटोले, शेख तुराब, सुनील कदम, रमेश साळवे, रवींद्र गंगावणे, संजय नवगिरे आदींनी स्वागत केले.