पान-2 सुधारीत बातमी दवर्लीत भाजपात
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:59+5:302015-03-08T00:30:59+5:30
दवर्लीत भाजपात बंडखोरी, सत्यविजय नाईक यांची अपक्ष उमेदवारी

पान-2 सुधारीत बातमी दवर्लीत भाजपात
द र्लीत भाजपात बंडखोरी, सत्यविजय नाईक यांची अपक्ष उमेदवारी33 सर्मथकांसह भाजपा नावेली मंडळ पदाचा राजीनामा : भाजपातर्फे तुयेकराचा उमेदवारी अर्जमडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीत दवर्लीत भाजपामध्ये बंडाळी माजली असून, तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर नावेली भाजपा मंडळाचे अध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी आपल्या 33 सर्मथकांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बंडखोरी करून नाईक यांनी शनिवारी दवर्लीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही सादर केला आहे.या मतदारसंघात भाजपा तिकिटासाठी रुमडामळ-दवर्लीचे माजी सरपंच उल्हास तुयेकर व सत्यविजय नाईक यांच्यात रस्सीखेच होती. दोघांनीही तिकिटावर आपली मजबूत दावेदारी केली होती. तिकीट कुणाला द्यावे यासाठी पक्षर्शेष्ठींनी नावेली मतदारसंघातील भाजपा मंडळाचा मतदान कौलही आजमावून बघितला होता. शेवटी शुक्रवारी उल्हास तुयेकर यांना भाजपाने उमेदवारी जारी केली होती.शनिवारी उल्हास तुयेकर यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज सादर केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व या मतदारसंघाचे पंच सदस्य या वेळी उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना तुयेकर यांनी आपली उमेदवारी ही आपल्या कार्याची पक्षांनी दिलेली पोचपावती असल्याचे सांगितले. सत्यविजय नाईक यांनीही या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस शेख जीना, तसेच नावेली भाजपा मंडळाचे सरचिटणीस मोहन कुलकर्णी व अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नाईक यांच्यासह कुलकर्णी यांनीही नावेली भाजपा मंडळाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.गेली 26 वर्षे आपण भाजपाशी प्रामाणिक राहिलो, उमेदवारीसाठी सदस्यांची मतेही आजमावून घेतली, यात आपल्याला 34 मते मिळाल्याचा दावा सत्यविजय नाईक यांनी केला, वरिष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून एका अपक्ष आमदारावर विश्वास ठेवून उमेदवारी दुसर्याला देण्यात आली. कामगारमंत्री तथा नावेलीचे आमदार आवेर्तान फुर्तादो यांच्यावर त्यांचा रोख होता.शेख जीना यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, आपण पक्षाचा राजीनामा दिला नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, दुपारी माजी जिल्हा पंचायत सदस्य अतुल वेर्लेकर यांनी दवर्ली मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. या मतदारसंघातून त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या पाठिंब्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, आपण राजकारणात आल्यापासून फालेरो हे आपल्या पाठीमागे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ढँ3 : 0703-टअफ-06 कॅप्शन: दवर्ली मतदारसंघातून भाजपातर्फे उल्हास तुयेकर उमेदवारी अर्ज सादर करताना. सोबत भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो व इतर. (छाया: अरविंद टेंगसे)ढँ3 : 0703-टअफ-08 कॅप्शन: बंडखोरी करून सत्यविजय नाईक दवर्ली मतदारसंघातून उमेदवारी सादर केली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राज्य सरचिटणीस शेख जीना व इतर. (छाया: अरविंद टेंगसे)ढँ3 : 0703-टअफ-09 कॅप्शन: दवर्ली मतदारसंघातून माजी जिल्हा पंचायत सदस्य अतुल वेर्लेकर यांनीही आपल्या सर्मथकासह उमेदवारी अर्ज सादर केला. (छाया: अरविंद टेंगसे)