पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:06 IST2025-09-25T08:55:32+5:302025-09-25T09:06:47+5:30
भारतीय हवाई दल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत ९७ तेजस मार्क-१ए विमानांसाठी ६६,५०० कोटी रुपयांचा मोठा करार करणार आहे.

पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
भारतीय वायुसेना हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत ९७ तेजस मार्क-1ए लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. सुमारे ६६,५०० कोटी रुपये खर्चाचा हा करार, भारतीय बनावटीच्या विमानांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठी संरक्षण करार ठरणार आहे.
हा करार गुरुवारी होण्याची शक्यता आहे. या कराराला विशेष महत्त्व आहे कारण, शुक्रवारपर्यंत भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील ३६ जुनी मिग-२१ विमाने निवृत्त होणार आहेत. यामुळे वायुसेनेची ताकद कमी होऊन ती २९ स्क्वॉड्रनवर येईल, हा आकडा आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
या नव्या करारामुळे वायुसेनेच्या स्क्वॉड्रनची संख्या वाढण्यास आणि ताकद अधिक मजबूत होण्यास मोठी मदत मिळेल. 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
भारताकडे २९ स्क्वॉड्रन शिल्लक राहतील
मिग-२१ निवृत्त झाल्यानंतर, भारताकडे २९ स्क्वॉड्रन शिल्लक राहतील. प्रत्येक स्क्वॉड्रनमध्ये १६ ते १८ लढाऊ विमाने असतात. दरम्यान, पाकिस्तानकडे सध्या २५ स्क्वॉड्रन असतील. शिवाय, शेजारी पाकिस्तान चीनकडून ४० जे-३५ए पाचव्या पिढीतील स्टेल्थ जेट्स खरेदी करण्याची तयारी करत आहे.
या विमानांच्या बाबतीत चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. चीनकडे भारतापेक्षा चार पट जास्त लढाऊ विमाने आणि बॉम्बर्स आहेत. त्यांच्याकडे इतर सामरिक क्षमता देखील आहेत.
'चीन आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी ४२.५ स्क्वाड्रन देखील अपुरे आहेत. भारतीय हवाई दलाने सांगितले आहे की, तेजसचे वितरण अत्यंत मंद गतीने सुरू आहे. एअर मार्शल एपी सिंग यांनी सांगितले की, हवाई दलाला लढाऊ विमानांच्या बाबतीत खूपच कमी निधी मिळत आहे आणि दरवर्षी किमान ४० नवीन लढाऊ विमानांची आवश्यकता आहे.