3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 03:13 PM2023-07-03T15:13:13+5:302023-07-03T15:13:52+5:30

PUBG खेळत असताना एका तरुणाची चार मुलांच्या आईशी मैत्री झाली. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि भारताता पोहचली.

pakistani women arrested in noida came to india to meet her online pubg friend with her 4 kids | 3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

googlenewsNext

कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. PUBG खेळत असताना एका तरुणाची चार मुलांच्या आईशी मैत्री झाली. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि भारताता पोहचली. गेल्या अनेक दिवसांपासून ती मित्रासोबत राहू लागली. पण एक दिवस या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाला. ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली आहे. आता पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा रबूपुरा येथे राहणारा सचिन एका दुकानात काम करायचा. त्याला PUBG खेळण्याची आवड होती. याच दरम्यान गेम खेळत असताना पाकिस्तानी महिलेशी संवाद सुरू झाला. खेळताना महिला आणि तरुण एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची स्वप्ने पाहू लागले. नंतर महिलेने भारतात येण्याचं प्लॅनिंग केलं 

पाकिस्तानी महिला दिल्लीमार्गे नेपाळमार्गे ग्रेटर नोएडा येथे पोहोचल्याचे सांगितले जात आहे. येथे ती तिच्या प्रियकरासोबत रबुपुरा येथे भाड्याच्या घरात राहू लागली. पाकिस्तानी महिलेने घरमालकाला तिचे नाव सीमा सांगितले होते. आश्चर्याची बाब म्हणजे 13 मे रोजी ही महिला तिच्या चार लहान मुलांना देखील सोबत घेऊन आली होती. 

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच 3 पथके तयार करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सची मदत घेण्यात आली आणि नंतर महिला आणि तिचा प्रियकर सचिनला अटक करण्यात आली. आता तपास यंत्रणा या दोघांची चौकशी करत आहेत.

सचिनचे घरमालक गिरजेश यांनी सांगितले की, सचिन हा शहरातील एका किराणा दुकानात काम करायचा. 13 मे पासून तो येथे राहत आहे. त्यांनी अडीच हजार रुपये भाड्याने घर घेतलं होतं. एके दिवशी भावाची तब्येत बिघडल्याचे सांगून सचिन, पाकिस्तानी महिला आणि मुले येथून निघून गेले होते. दीड महिना हे लोक येथे राहिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: pakistani women arrested in noida came to india to meet her online pubg friend with her 4 kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.