सच बोलो इंडियासे हो...? 100 रुपयांची नोट देत असल्याचे पाहून पाकिस्तानी ठेलेवाला जे म्हणाला...; व्हायरल Video पाहून तुम्हीच ठरवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:41 IST2026-02-10T14:39:42+5:302026-02-10T14:41:40+5:30

Indian Tourist in Pakistan : पाकिस्तानात भारतीय पर्यटकाने खरेदी केल्यानंतर भारतीय नोटा दिल्या. दुकानदार जेव्हा ऐकतो की पर्यटक भारतातून आहे, तेव्हा त्याने जे केलं ते पाहून...

Pakistani Street Vendor Viral Video: Tell me the truth, are you from India?... What the Pakistani vendor said when he saw me giving him a 100 rupee note...; Watch the viral video and decide for yourself... | सच बोलो इंडियासे हो...? 100 रुपयांची नोट देत असल्याचे पाहून पाकिस्तानी ठेलेवाला जे म्हणाला...; व्हायरल Video पाहून तुम्हीच ठरवा...

सच बोलो इंडियासे हो...? 100 रुपयांची नोट देत असल्याचे पाहून पाकिस्तानी ठेलेवाला जे म्हणाला...; व्हायरल Video पाहून तुम्हीच ठरवा...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या बातम्या आपण रोजच वाचतो, मात्र याच दोन देशांमधील सामान्यांच्या मनातील प्रेम आणि आदराची एक सुखद कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका भारतीय पर्यटकाने पाकिस्तानमधील रस्त्यावरील विक्रेत्याकडून सुका मेवा खरेदी केला आणि त्याला भारतीय नोटांमध्ये पैसे देण्याचा प्रयत्न केला. यावर त्या पाकिस्तानी विक्रेत्याने जे उत्तर दिले, ते ऐकून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक भारतीय व्लॉगर पाकिस्तानमध्ये फिरताना दिसतोय. तो एका रस्त्यावरील विक्रेत्याकडून काळ्या मनुकांसारखा सुका मेवा खरेदी करतो. चव पाहिल्यानंतर तो २५० ग्रॅम पाकीट घेतो आणि त्याचे पैसे देण्यासाठी पाकिटातून १०० रुपयांची भारतीय नोट काढतो. भारतीय नोट पाहून तो दुकानदार सुरुवातीला थोडा गोंधळतो आणि म्हणतो, "हे इथे चालणार नाही." त्यावर पर्यटक हसून म्हणतो की, "याची किंमत तुमच्या ३०० रुपयांइतकी आहे." यावर ठेलेवाला दुकानदार त्याला विचारतो की, खरे सांगा तुम्ही भारतीय आहात का? पर्यटक जेव्हा आपली ओळख सांगतो की, "मी भारतातून आलो आहे," तेव्हा मात्र त्या दुकानदाराची प्रतिक्रिया पूर्णपणे बदलली.


"मेहमान हो आप..."
'भारत' हे नाव ऐकताच त्या विक्रेत्याचा चेहरा आनंदाने फुलला. त्याने आश्चर्याने विचारले, "भारतातून आला आहात? खरं सांगताय? मग राहू द्या पैसे, तुम्ही आमचे पाहुणे आहात!". त्या विक्रेत्याने आदराने पैसे घेण्यास नकार दिला. पर्यटकाने आग्रह केल्यावर दुकानदाराने पाकिस्तानी रुपये स्वीकारले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'Rizwansidravlog' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title : भारतीय पर्यटक से पाकिस्तानी विक्रेता ने पैसे लेने से किया इनकार।

Web Summary : दिल जीतने वाले वीडियो में, एक पाकिस्तानी विक्रेता भारतीय मुद्रा लेने में पहले झिझकता है, फिर पर्यटक की राष्ट्रीयता जानकर भुगतान लेने से इनकार कर देता है, और उसे मेहमान के रूप में स्वागत करता है।

Web Title : Pakistani vendor refuses money from Indian tourist, offers hospitality.

Web Summary : A heartwarming video shows a Pakistani vendor initially hesitant to accept Indian currency, then refusing payment upon learning the tourist's nationality, welcoming him as a guest.