शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

हेरगिरी प्रकरण : लष्करापासून कश्‍मीरपर्यंत, दिल्लीत 'असे' सुरू होते पाकिस्तानी गुप्त हेरांचे मिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 12:30 IST

नवी दिल्‍ली : इंटर-सर्व्हिसेस इंटेजिलन्सचे ( आयएसआय ) गुप्तहेर पाकिस्‍तानच्या हाय कमिशनमध्ये काम करत माहिती मिळवत होते. रविवारी काही ...

ठळक मुद्देआयएसआयचे हे अधिकारी लष्करातील अधिकाऱ्यांना भेटत आणि 'न्‍यूज'साठी माहिती घेत आहोत, असे सांगत. कश्‍मीरपासून लष्करापर्यंतचे सीक्रेट्स मिळविण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.भारताने पाकिस्‍तान हाय कमिशनच्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना 24 तासांत देश सोडून जाण्यास सांगीतले आहे.

नवी दिल्‍ली : इंटर-सर्व्हिसेस इंटेजिलन्सचे (आयएसआय) गुप्तहेर पाकिस्‍तानच्या हाय कमिशनमध्ये काम करत माहिती मिळवत होते. रविवारी काही महत्वाच्या दस्तऐवजांची देवघेव करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे पाकिस्तानच्या 'स्‍पाय ट्रॅप'ची पोलखोल झाली आहे. आयएसआयचे हे अधिकारी लष्करातील अधिकाऱ्यांना भेटत आणि 'न्‍यूज'साठी माहिती घेत आहोत, असे सांगत. माहिती मिळताच आयएसआयपर्यंत पोहोचवत होते. कश्‍मीरपासून लष्करापर्यंतचे सीक्रेट्स मिळविण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

संबंधित दोघांनाही आयएसआयची संपूर्ण ट्रेनींग मिळाली होती. आबिद हुसैन (42) आणि ताहीर खान (44) बनावट आधारकार्ड घेऊन फिरत होते. ते ज्या कारमध्ये फीर होते, ती जावेद हुसैन चलवत होता. ते डिफेन्स अधिकाऱ्यांना सातत्याने लालूच दाखवत, तसेच ना-ना बहाने करून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे ते मिलट्री इंटेलिजेन्सच्या रडारवर होते. दिल्‍ली पोलिसांच्या मदतीने त्यांना ट्रॅक करायला सुरुवात करण्यात आली होती. हे दोघेही रविवारी करोलबाग येथे अत्यंत महत्वाच्या माहितीसंदर्भात डिफेन्स कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्याकडून 15 हजार रुपये आणि दोन आयफोनदेखील जप्त करण्यात आले.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

Paytmने व्हायचे पेमेंट -पाकिस्तान हाई कमिशनच्या डिपार्टमेन्ट ऑफ ट्रेडमध्ये सहायक असलेला आबिद हुसैन आयएसआयचा एजन्ट होता. आयएएनएस वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्‍तानातील पंजाबचा रहिवासी आहे. त्याने आपण अमृतसरचे असल्याचे भारताला सांगितले. मोहम्‍मद ताहीरचे इस्‍लामाबादशी संबंध आहेत. तसेच तो HCमध्ये अप्पर डिव्हिजन लिपिकदेखील आहे. हे दोघेही दोन वर्षांपासून हाय कमिशनमध्ये होते. त्यांची गाडी चालवणारा जावेदही पाकिस्तानातीलच आहे. हे दोघेही 'न्‍यूज रिपोर्टर' असल्याचे खोटे सांगून माहिती गोळा करत होते. त्यांना प्रत्येक आर्टिकलसाठी 25 हजार रुपये आणि महागडे गिफ्टदेखील मिळत होते. त्यांना Paytm सारख्या अॅपनेही पैसे मिळत होते.

George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

24 तासांत देश सोडण्याचे आदेश -दोन हेर पकडल्यानतंर पाकिस्तान गडबडला आहे. भारत आपल्या कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचे खोटे आरोप लावत आहे. तसेच त्यांना टॉर्चर करण्यात येत आहे. असे पाकिस्तानने म्हटले आहे.  या हेरांविरोधात ऑफिशियल्‍स सिक्रेट्स अॅक्‍टनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताने पाकिस्‍तान हाय कमिशनच्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना 'पर्सोना नॉन ग्रॅटा' म्हणून घोषित केले असून त्यांना 24 तासांत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.

CoronaVirus News: ...तर फक्त स्वप्नच बनून राहणार 'चमत्कारिक' कोरोना व्हॅक्सीन? अतिघाई पडेल महागात

टॅग्स :Pakistanपाकिस्तानISIआयएसआयPunjabपंजाबdelhiदिल्लीPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवानIndiaभारत