अखेर बदला घेतलाच! विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:11 PM2019-08-20T21:11:31+5:302019-08-20T21:13:34+5:30

काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसविण्यासाठी अहमद खान प्रयत्न करत होता

Pakistani commando behind capture of Indian Wing Commander Abhinandan Varthaman killed | अखेर बदला घेतलाच! विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार

अखेर बदला घेतलाच! विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय वायूसेनेचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा छळ करणाऱ्या पाक कमांडोचा खात्मा करुन भारताने बदला पूर्ण केला. पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्तमानला छळणारा पाक कमांडो अहमद खान याला भारतीय जवानांनी ठार केलं. अहमद खान भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय जवानांनी ही कारवाई केली आहे. 

पाकिस्तान लष्कराच्या विशेष समुहाचा कमांडो अहमद खानला भारतीय जवानांनी १७ ऑगस्ट रोजी एलओसीच्या नौशेरा सेक्टरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी त्यांना ठार केलं आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसविण्यासाठी अहमद खान प्रयत्न करत होता. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.

भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. 

Web Title: Pakistani commando behind capture of Indian Wing Commander Abhinandan Varthaman killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.