शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

Corona Vaccine For Pakistan: दानत लागते! वैरी असूनही पाकिस्तानला भारत कोविशिल्डचे 1.6 कोटी डोस देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 7:52 AM

Corona Vaccine For Pakistan: get 1.6 crore doses of Covishield by India - पुण्याची कंपनी सीरम इंस्टीट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस पाकिस्तानसाठी उपलब्ध केली जाणार आहे. द ग्‍लोबल अलायंस फॉर वैक्‍सीन अँड इम्यूनाइजेशन (Gavi) द्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पाकिस्तान ((Pakistan) भारताविरोधात गेल्या काही दशकांपासून दहशतवाद पोसत आला आहे. या दहशतवाद्यांवर एवढा पैसा उधळला की आता त्यांच्याकडे खायलाही पैसे नाहीत. दररोज सीमेपलिकडून उखळी तोफा, गोळीबार ठरलेलाच. या दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. तरीही भारताने नेहमी पाकिस्तानला मदत केली आहे. आजही कोरोनाच्या संकटात भारताने स्वत:ची गरज विसरून कंगाल झालेल्या पाकिस्तानला कोरोना लसीचे (Corona Vaccine) तब्बल 1.6 कोटी डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan will use Made in India Corona Vaccine for vaccination drive.)

 पुण्याची कंपनी सीरम इंस्टीट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस पाकिस्तानसाठी उपलब्ध केली जाणार आहे. द ग्‍लोबल अलायंस फॉर वैक्‍सीन अँड इम्यूनाइजेशन (Gavi) द्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संघटना जगातील गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. यानुसार पाकिस्तानला कोरोना लसीचे पहिले पार्सल मार्चच्या मध्यावर पोहोच केले जाणार आहे. तर जूनपर्यंत 1.6 कोटी डोस पोहोचते केले जाणार आहेत. 

गेल्या आठवड्यात पाकिस्ताननेच खुलासा केला...जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतातही या लसीकरणाला सुरूवात झाली असून भारतानं अनेक देशांना आतापर्यंत लसीचा पुरवठा केला आहे. परंतु पाकिस्ताननं भारताकडे लसींची मागणी केली नव्हती. चीननं काही लसी पाकिस्तानला मोफत दिल्या होत्या. परंतु आता मोठी बाब समोर आली आहे. पाकिस्तान आताही मोफत लस मिळण्याच्याच भरवशावर असून यावर्षी पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांसाठी लसींची खरेदी करणार नसल्याचं वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

Corona Vaccine: ...तर कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासणार; सीरम इन्स्टीट्यूटचा केंद्राला इशारा

नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सेक्रेटरी अमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरूवारी पब्लिक अकाऊंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान ही माहिती दिली. "इमरान सरकार सध्या महासाथीचा सामना करण्यासाी हर्ड इम्युनिटी आणि आपल्या सहकारी देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर अवलंबून असेल," असं ख्वाजा यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या महासाथीपासून आपल्या देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. परंतु या उलट पाकिस्तान लसींची खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय डोनर्स आणि चीनसारख्या देशांवर लसीसाठी मोफत लसीसाठी अवलंबून आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPakistanपाकिस्तानIndiaभारत