शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:01 PM

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. 

जम्मू-काश्मीर : जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ जवान तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. दरम्यान, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

गेल्या चार दिवसांपूर्वी पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता  रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.

भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्तजम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात यश मिळाले आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBSFसीमा सुरक्षा दल