शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भारतानं कारवाई केल्यास चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांचे सैन्याला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 22:01 IST

इम्रान खान यांची लष्करप्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कराला पूर्ण सूट दिली आहे. भारतीय सैन्यानं कारवाई केल्यास पाकिस्तानी सैन्यानं जशास तसं उत्तर द्यावं, असे आदेश खान यांनी लष्कराला दिले आहेत. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आली होती, असंदेखील त्यांनी म्हटलं. पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट दिली असल्याचं एका रॅलीला संबोधित करताना म्हटलं होतं. आता कारवाईची वेळ आणि ठिकाण लष्कर ठरवेल, असं मोदी जाहीरपणे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आज लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या आधी ही चर्चा झाल्याचं वृत्त एआरवाय न्यूजनं दिलं. खान आणि बाजवा यांच्यात देश आणि त्याच्या आसपासचा भाग यांची सुरक्षेवर चर्चा झाली. पुलवामातील हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध हे चर्चेचे मुख्य विषय होते.इम्रान खान आणि कमर जावेद बाजवा यांच्यातील चर्चा संपल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. खान या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यामध्ये बाजवा, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर, संरक्षणमंत्री परवेज खटक, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी, गृह राज्यमंत्री शहरयार आफ्रिदी यांच्यासह काही वरिष्ठ नेतेही बैठकीला हजर होते. या बैठकीत कुलभूषण जाधव प्रकरणावरदेखील चर्चा झाली. सध्या या प्रकरणावर हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानTerrorismदहशतवाद