शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

एलओसीखाली बोगद्यांचे जाळे विणण्याचा पाकचा कट; घुसखोरी वाढविण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:52 IST

कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास भारत सज्ज

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर 'मुळे अडचणीत आलेले पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी गट त्यांच्या कारवाया पुन्हा वाढवत असून, एलओसीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा कट आखत आहेत.

पाकिस्तानी सैन्याच्या थेट पाठिंब्याने बनवलेले हे अत्याधुनिक भूमिगत मार्ग दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी मदत करणारे ठरणार आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा संस्थांकडून आलेल्या अहवालानुसार, अलीकडेच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कर अधिकारी आणि दहशतवादी संगनमताने काम करताना दिसून आले आहेत. हे अधिकारी पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर्सलाही भेटताना दिसले. तसेच त्यांनी एलओसीवरही पाहणी केलेली आहे. सीमेवरून अतिरेक्यांची घुसखोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोगद्यांचे जाळे विणण्याचा कट आखण्यात येत आहे, असेही अहवालात म्हटले आहे. भारताच्या सैन्याने २४हून अधिक अशा बोगद्यांचा पर्दाफाश केला आहे. या बोगद्यांचे मूळ पाकमध्ये आहे व ते हल्ल्यांशी जोडले गेलेले आहेत.

अशी आहे भारताची तयारी

या धोक्याचा सामना भारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतीनेही करीत आहे. 

भेदक रडारने सुसज्ज असलेले ड्रोनचे थवे सीमेवर बारीक लक्ष ठेवतात आणि दडलेल्या संरचना शोधून काढतात. 

भूकंपीय सेन्सर्स खोदकामातून होणाऱ्या कंपनांची नोंद ठेवतात. तर हाय रिझोल्युशन उपग्रह छायाचित्रे रिअल-टाइम पाळत ठेवतात.

मानवी बुद्धिमत्तेच्या साह्याने उन्नत टनेल रॅट बारकाईने मोहिमा पार पाडतात, तर बोगदाविरोधी यंत्रणा खंदकांच्या प्रवेशद्वारांना टिपते. पाकिस्तानने कितीही नकार दिला असला तरी, बोगद्यांवरच दहशतवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे पुढे येते.

पुलवामा हल्ल्यासाठी... 

२०१९मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात भारताचे ४० सैनिक शहीद झाले होते. २०१६मध्ये नागरोटा येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी दहशतवादी सामील होते. हे सर्वजण या भूमिगत मार्गाचा वापर करून भारतात घुसलेले होते.

बहुतांश बोगदे जम्मूच्या सपाट भागात, नदी-खोऱ्यात 

बहुतांश बोगदे जम्मूच्या सपाट भागात, नदी-खोऱ्याच्या भागात आहेत. तेथे मातीचे खोदकाम करण्यास सुलभ जाते. परंतु शोध घेण्यास अवघड जाते. हे काही सर्वसामान्य खोदकाम नाही. काही बोगदे ५०० मीटर लांबीचे व ३० मीटर खोलवर पसरलेले आहेत. त्यात प्रगत ऑक्सिजन पुरवठा प्रणाली आहे. तसेच मेड इन कराची वाळूच्या पिशव्यांनी मजबूत केलेले आहेत. भारताने केलेल्या तपासात बोगद्यांची दुसरी बाजू थेट पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांपर्यंत जात असल्याचे आढळले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान