LoC वर 300 मीटर उंचीवर घिरट्या घेत होतं पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 18:58 IST2018-02-21T18:57:51+5:302018-02-21T18:58:26+5:30

जम्मू काश्मीरच्या पुंछ परिसरातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरला उडताना पाहण्यात आलं आहे

Pakistan military helicopter seen flying on LOC near Poonch | LoC वर 300 मीटर उंचीवर घिरट्या घेत होतं पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर

LoC वर 300 मीटर उंचीवर घिरट्या घेत होतं पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या पुंछ परिसरातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरला उडताना पाहण्यात आलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर जवळपास 300 मीटर उंचीवर उडत होतं. काही वेळ घिरट्या घेतल्यानंतर हेलिकॉप्टर माघारी परतलं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9.45 ते 10 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. हेलिकॉप्टर पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या पल्लानडी परिसरातून जात होतं अशी माहिती लष्करी सुत्रांनी दिली आहे. 



 

Web Title: Pakistan military helicopter seen flying on LOC near Poonch