नवी दिल्ली - २८ पर्यटकांचा जीव घेणाऱ्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून, हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला आहे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसने या हल्ल्याचा निषेध केला. काँग्रेस मुख्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत हा निषेध करण्यात आला.
संपूर्ण देशाला एकजूट होण्याची गरज निर्माण झाली असताना सत्ताधारी मात्र या हल्ल्याचा उपयोग तुष्टीकरण आणि भेदभावाची भावना तीव्र करण्यासाठी करीत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आज देशभर 'कँडल मार्च'हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दहशतवादाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस शुक्रवारी संध्याकाळी देशभरात 'कँडल मार्च' काढणार आहे.
राहुल गांधी काश्मीरमध्येजखमी झालेल्या लोकांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज अनंतनाग येथे भेट घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र व्दिवेदी हे देखील शुक्रवारी श्रीनगरला जाणार आहेत.