इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:05 IST2025-05-27T15:04:41+5:302025-05-27T15:05:48+5:30

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat | इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच गुजरात दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी गांधीनगर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला अल्टिमेटमही दिला. पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबली आहे. तो शांततेच्या गप्पा मारू लागला आहे. पंतप्रधान मोदींचे विधान प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणारे आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी वडोदरा, भुज आणि दाहोदलाही भेट दिली.

पंतप्रधान मोदींच्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या पंतप्रधानांनी गुजरातमधून केलेल्या विधानाची पाकिस्तानने दखल घेतली आहे. त्यांच्या विधानामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण गोऊ शकतो. आम्हाला शांतता हवी आहे. पण आम्हाला धोका वाटला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ."

पाकिस्तानने स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे -
पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -
गुजरातमधील गांधीनगर येथे बोलताना पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत म्हणाले, “६ मे च्या रात्री पाकिस्तानात जे मारले गेले, त्यांना स्टेट ऑनर देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामीही दिली. यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी वॉर नाही, तर तुमची (पाकिस्तानची) विचारपूर्वक आखलेली युद्धनीती आहे. जर तुम्ही युद्ध करत असाल, तर तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर मिळेल." तत्पूर्वी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
 

Web Title: pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.