शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:11 AM

पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन यंदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 400 टक्क्यांनी वाढ पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने 111 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. त्यातुलनेत यंदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  शस्त्रसंधी उल्लंघनादरम्यान पाकिस्तानने फक्त भारतीय चौक्या आणि गावांवरच हल्ले केले नाहीत, तर भारतीय जवानांवर सुद्धा गोळीबार केला आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने यंदा दर दिवशी किमान तीन वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या नापाक हरकतींनी भारतीय जवांनांकडून चोख प्रत्युत्तरही दिले जात आहे. 2003 मधील सीजफायर पॅक्ट पूर्णपणे लागू करण्यासंबंधी 29 मे रोजी पाकिस्तान आणि भारताच्या DGMOs ची बैठकीत दोन्हीं देशांकडून सहमती झाली होती. तरी सुद्धा पाकिस्तानकडून भारताला उकसवण्याचा प्रकार घडत आहे.  अधिका-यांनी सांगितले की, इस्लामाबादमध्ये सध्या सरकारची अनुपस्थिती पाकिस्तान सैन्याच्या या कारवाईचे मोठे कारण आहे.  आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले आहे, कारण पाकिस्तान रेंजर्स आणि तेथील सैन्य कोणत्याही नेतृत्वाला उत्तर देण्यास बांधील नाही आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक कमांडर्सनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, 25 जुलैला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत शस्त्रसंधी उल्लंघन सुरु राहिल असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI देखील सक्रिय सहभाग घेत असून बीएसएफच्या जवानांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानी रेंजर्सची मदत मिळत आहे.  

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानBSFसीमा सुरक्षा दलIndian Armyभारतीय जवानBorderसीमारेषाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरISIआयएसआय