भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:26 IST2018-10-29T17:25:34+5:302018-10-29T17:26:07+5:30
वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्ताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली
श्रीनगर - वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्ताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे. लष्कराने नियंत्रण रेषेजवळचे पाकिस्तानी लष्कराचे प्रशासकीय कार्यालय उडवले.
नियंत्रण रेषेवर नेहमीच आगळीक करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पुंछ आणि झाल्लास भागांमध्ये मोर्टार डागले होते. त्याला प्रत्युत्तर देताना लष्कराने पाकिस्तानी लष्कराच्या प्रशासकीय मुख्यालयालाच लक्ष्य करून हल्ला केला. ही घटना 23 ऑक्टोबरची असून, आता याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#WATCH: Pakistan army administrative HQ targeted along LoC near Poonch by Indian Army in retaliation to Pakistan’s mortar shelling of Poonch and Jhallas on October 23 pic.twitter.com/o0C6UJQqcr
— ANI (@ANI) October 29, 2018