शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 22:18 IST

Pahalgam Terrorist Attack Helpline Number: हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, पुण्यातील कुटुंबावरही ओढवला भयानक प्रसंग

Pahalgam Terrorist Attack Helpline Number: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अंदाजे ३० जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील बैसरनच्या गवताळ प्रदेशात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. त्यावेळी सुमारे ३ वाजता अचानक गोळीबार झाला आवाज आला आणि सर्वत्र आरडाओरडा झाला. हल्ल्यानंतर, पर्यटकांना मदत आणि माहिती देण्यासाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ९५९६७७७६६९, ०१९३२२२५८७० (९४१९०५१९४० व्हाट्सअप) हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहेत. दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा अलिकडच्या काळात नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.

हिंदूंना कलमा पढण्यास भाग पाडलं...

आसावरी यांनी आजतकला सांगितले की, दहशतवादी स्थानिक पोलिसांच्या गणवेशात आले होते आणि त्यांनी मास्क घातले होते. त्यांनी फक्त पुरुषांना लक्ष्य केले आणि विशेषतः हिंदूंना कलमा म्हणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाचता येत नव्हते, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. माझ्या वडिलांना माझ्यासमोर तीन गोळ्या घालण्यात आल्या. माझ्या काकांनाही गोळ्या लागल्या. आम्ही तंबूच्या मागे लपलो होतो. स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाहून आम्ही घाबरलो आणि आम्हीही कलमा पढायला लागलो आणि तेथून पळून गेलो. आम्ही घोड्यांवरून पळून कसाबसा जीव वाचवला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPoliceपोलिसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला