सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 20:05 IST2025-05-04T20:05:07+5:302025-05-04T20:05:49+5:30

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दोन्ही देशांमधील वातावरणावरून युद्धाला कधीही तोंड फुटेल, असे दावे केले जात आहेत, अशा परिस्थितीत पाकिस्तानचा मित्र असेल्या तुर्कीच्या नौदलाचं एक जहाज टीसीजी बुयुकादा रविवारी कराची बंदरात दाखल झालं आहे.

Pahalgam Terror Attack: Tension on the border, Pakistan's ally sent a warship directly to Karachi, why? | सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?

सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दोन्ही देशांमधील वातावरणावरून युद्धाला कधीही तोंड फुटेल, असे दावे केले जात आहेत, अशा परिस्थितीत पाकिस्तानचा मित्र असेल्या तुर्कीच्या नौदलाचं एक जहाज टीसीजी बुयुकादा रविवारी कराची बंदरात दाखल झालं आहे. हे जहाज केवळ सदिच्छा म्हणून आलं असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या ज्या पद्धतीचा तणाव आहे तो पाहता या जहाजाकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जात आहे.

तुर्कीचं टीसीजी बुयुकादा हे जहाज कराची बंदरात आलं तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या या प्रवासादरम्यान, पाकिस्तान आणि तुर्कीच्या नौदलामध्ये प्रशिक्षणातील सहकार्य आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान वेगवेगळ्या कवायतीसुद्धा केल्या जातील.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, तुर्कीच्या नौदलाच्या जहाजाचं आगमन पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील दृढ संबंध, बंधुभाव आणि स्थायी मैत्रीचं ज्वलंत उदाहरण आहे. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृच दतशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.   

Web Title: Pahalgam Terror Attack: Tension on the border, Pakistan's ally sent a warship directly to Karachi, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.