पहलगाम हल्ल्यावेळी झिपलाईन ऑपरेटर पर्यटकाला सोडताना अल्लाहू अकबर असे म्हणत होता. त्याला या दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती होते किंवा तो यात सहभागी होता, असा संशय ऋषी भट या पर्यटकाने केला आहे. यावरून हा झिपलाईन ऑपरेटर एनआयएच्या रडारवर आला आहे. या झिपलाईन ऑपरेटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना काश्मीरमधील नेत्यांनी हे सामान्य असल्याचे म्हटले आहे.
ऋषी भट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसणारा झिपलाईन ऑपरेटर गोळीबार होत असताना अल्लाहू अकबर असे म्हणत होता. यावर पीडीपीने तो केवळ तसे म्हणत होता म्हणून त्याच्यावर संशय घेतला जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. पीडीपीचे प्रवक्ते मोहम्मद इक्बाल ट्रंबू यांनी, या लोकां ना आमच्या संस्कृतीबाबत काहीही माहिती नाही. जेव्हा जेव्हा कोणते संकट येते तेव्हा प्रत्येक काश्मीरी अल्लाहू अकबर असे म्हणतो. तो अशावेळी अल्लाची आठवण काढतो, असे त्यांनी सांगितले.
आपले अपयश लपविण्यासाठी हे सर्व केले जात आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना त्यांची सिस्टीम बदलावी लागेल. या गोष्टीचा दहशतवादाशी काही संबंध नाही. बिसमिल्ला, अल्लाहू अकबर असे जेव्हा असे काही घडेल तेव्हा पाकिस्तानी म्हणेल. या लोकांना प्रत्येक गोष्टीत चुकीची माहिती दिली जाते, असे ट्रंबू यांनी म्हटले.
याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते इमरान नबी डार यांनी देखील याचीच माहिती दिली आहे. जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर संकट येते तेव्हा तो देवाचे स्मरण करतो, हे स्वाभाविक आहे. ऑपरेटर मुस्लिम होता त्यामुळे त्याने अल्लाचे नाव घेतले. तपास यंत्रणांनी निर्दोष लोकांना लक्ष्य करू नये, असे डार यांनी म्हटले आहे. एकंदरीत त्या ऑपरेटरने असे का म्हटले याचे राजकीय पक्षांनी असा तर्क लावला असला तरी आता तोच एनआयएला याचे उत्तर देणार आहे.