पान 7 : पेडण्यात तिघा बॅटरीचोरांना पोलिस कोठडी
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30
पेडणे (प्रतिनिधी) : मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या तिघांना पेडणे पोलिसांनी अटक केली. आफताब अली (32, रा. रामपूरनगर, उत्तर प्रदेश) जमीर महम्मद अमीसमुल्ला (31, रा. पसाडीपूर, उत्तर प्रदेश) आणि शहाबान चौधरी (रा. रमारीयागंज, उत्तर प्रदेश) हे तिघेजण सध्या कुचेली-म्हापसा येथे राहात होते. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली.

पान 7 : पेडण्यात तिघा बॅटरीचोरांना पोलिस कोठडी
प डणे (प्रतिनिधी) : मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या तिघांना पेडणे पोलिसांनी अटक केली. आफताब अली (32, रा. रामपूरनगर, उत्तर प्रदेश) जमीर महम्मद अमीसमुल्ला (31, रा. पसाडीपूर, उत्तर प्रदेश) आणि शहाबान चौधरी (रा. रमारीयागंज, उत्तर प्रदेश) हे तिघेजण सध्या कुचेली-म्हापसा येथे राहात होते. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली.पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांद्रे टेलिफोन विभागाचे अभियंते लवीन पिल्ले यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरीला गेल्याची तक्रार पेडणे पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांनी गुन्हा कबूल करून या बॅटर्यांची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. भारतीय दंड संहिता कलम 380 नुसार गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण देसाई पुढील तपास करत आहे.