पान 7 : नीता नाईक खुनी हल्ला खटला अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:43+5:302015-09-03T23:05:43+5:30
मडगाव : कारवार येथील नीता नाईक हिच्यावरील खुनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात आले आहे. 14 सप्टेंबर रोजी आरोपीचा जबाब नोंदवून घेण्यात येईल. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी 11 साक्षीदार तपासले.

पान 7 : नीता नाईक खुनी हल्ला खटला अंतिम टप्प्यात
म गाव : कारवार येथील नीता नाईक हिच्यावरील खुनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात आले आहे. 14 सप्टेंबर रोजी आरोपीचा जबाब नोंदवून घेण्यात येईल. अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी 11 साक्षीदार तपासले.पेडा - खारेबांद येथील प्रशांत नाईक (35) याने कारवार येथील नीता नाईक हिला नोकरीचे आमिष दाखवून व्हिसा तयार करण्याच्या निमित्ताने 2 जून 2010 रोजी दुपारी फोंडा येथे बोलावले. तेथून तिला कारमधून तो वेळसांव येथील रेमेंत हिल थ्री किंग चॅपेलजवळ गेला. तेथील निर्जन डोंगराळ भागात नेऊन त्याने नीताच्या डोक्यावर लोखंडी कांबीने वार करून तिला गंभीर जखमी केले. नीता बेशुध्द पडल्यानंतर तिच्या पर्समधील रोकड, मोबाईल संच आणि अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्याच दिवशी हवाईमार्गे आरोपी दोहा कतार येथे निघून गेला होता. वेर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी देशातील सर्व विमानतळांवर या आरोपीविरुध्द लूकआउट नोटीस जारी केली होती.सुमारे चार वर्षांनी आरोपी प्रशांत नाईक हा गोव्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 1 जुलै 2014 रोजी दाबोळी विमानतळावर वेर्णा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे. नीता नाईक हिच्या खुनाचा प्रयत्न करणे, पुरावा नष्ट करणे व चोरी करणे या गुन्?ांखाली त्याच्याविरुध्द खटला चालू आहे. (प्रतिनिधी)