पान ४- आत्महत्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांची साक्ष
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:21+5:302015-07-22T00:34:21+5:30
मडगाव : विभा परुळेकर आत्महत्या प्रकरणात या प्रकरणातील चौकशी अधिकारी असलेले पोलीस निरीक्षकफिलोमेन कोस्ता यांची साक्ष दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी घेतलेल्या सरतपासणीत विभा परुळेकर हिच्या मृतदेहाचा पंचनामा आपण केला. तसेच तिच्या आईच्या घराचा झडती पंचनामा केला, असे कोस्ता यांनी सांगितले. या वेळी ॲड. दशरथ सावंत यांनी उलटतपासणी घेतली.

पान ४- आत्महत्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांची साक्ष
म गाव : विभा परुळेकर आत्महत्या प्रकरणात या प्रकरणातील चौकशी अधिकारी असलेले पोलीस निरीक्षकफिलोमेन कोस्ता यांची साक्ष दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी घेतलेल्या सरतपासणीत विभा परुळेकर हिच्या मृतदेहाचा पंचनामा आपण केला. तसेच तिच्या आईच्या घराचा झडती पंचनामा केला, असे कोस्ता यांनी सांगितले. या वेळी ॲड. दशरथ सावंत यांनी उलटतपासणी घेतली. वास्को येथील मूळ विभा पास्वान हिचे वेर्णा येथील एका आस्थापनात कामाला असलेल्या गौतम परुळेकर यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. विभाची आई तौलादेवी ही पैशासाठी तगादा लावत असल्यामुळे, तसेच आईला पैसे देत असल्याने नवर्याकडून तिचा छळ होत असल्याने या सर्व छळाला कंटाळून विभाने जुवारी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. विभाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिची आई तौलादेवी व पती गौतम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. (प्रतिनिधी)