शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
3
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
4
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
5
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
6
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
7
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
8
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
9
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
10
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
11
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
12
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
13
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
14
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
15
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
16
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
17
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
18
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
19
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
20
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

पान 4 : महाकाली मंदिर बांधण्यास नेरूलला ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

बेती वेरे : नेरूल महाकाली मंदिरात तोडफोड करून देवीची मूर्ती व इतर साहित्य गायब केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी तपास करून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली. काल झालेल्या तक्रारीनंतर देवस्थान मोडलेल्या स्थळी सकाळी ग्रामस्थ उपस्थित झाले. सरपंच शशिकला गोवेकर, पंच प्रकाश कळंगुटकर, दशरथ कळंगुटकर, महादेव रिवणकर, गजानंद नाईक, अँड. दिनेश आश्वेकर, विनायक मयेकर व इतर ग्रामस्थ हजर झाल्यानंतर देवस्थानच्या जागी बांधकाम साहित्य उतरू लागले.

बेती वेरे : नेरूल महाकाली मंदिरात तोडफोड करून देवीची मूर्ती व इतर साहित्य गायब केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी तपास करून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली. काल झालेल्या तक्रारीनंतर देवस्थान मोडलेल्या स्थळी सकाळी ग्रामस्थ उपस्थित झाले. सरपंच शशिकला गोवेकर, पंच प्रकाश कळंगुटकर, दशरथ कळंगुटकर, महादेव रिवणकर, गजानंद नाईक, अँड. दिनेश आश्वेकर, विनायक मयेकर व इतर ग्रामस्थ हजर झाल्यानंतर देवस्थानच्या जागी बांधकाम साहित्य उतरू लागले.
दरम्यान, पर्वरी, साळगाव, कळंगुट व हणजूण पोलीस स्थानकातील एक ताफा घटनास्थळी येऊन धडकला. पाठोपाठ डॉन बॉस्को संस्थेचे फादर व इतर पाच पदाधिकारी घटनास्थळी येताच ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. म्हापसाचे मामलेदार मधू नार्वेकर मंदिराच्या ठिकाणी उभे राहून बांधकाम थांबविण्याचा इशारा करू लागले. ग्रामस्थांतून जवळपास 500 महिलांनी त्यांच्याकडे जाऊन मंदिराच्या जागेवरून हटण्याची मागणी केली. त्याला अनुसरून मामलेदार जागेवरून हटून दूरवर उभे राहिले. त्यानंतर पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी मंदिर तोडफोडप्रकरणी अपराध्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
पोलिसांनी लगेचच पंचनामा केला व श्वानपथकाद्वारे मागोवा काढण्याचा प्रय} केला; परंतु काहीही सफल झाले नाही. उपजिल्हाधिकारी खोर्जुवेकर व उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी पोलीस निरीक्षक व मामलेदार यांच्याशी चर्चा करून ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलविले. झालेल्या चर्चेत जातीय दंगा किंवा सामाजिक शांतता भंग होऊ नये व शांततेत चर्चा व्हावी अशी विनंती खोर्जुवेकर यांनी ग्रामस्थांना केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयात दोन्ही बाजूच्या व्यक्तींना चर्चेसाठी आमंत्रित केले. त्यावर आम्ही देवस्थान पूर्ण केल्यानंतर चर्चेसाठी तुमच्याकडे येऊ, असे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.
प्रवीण शिरोडकर, विनायक मयेकर, राजेश कळंगुटकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने मूर्ती व साहित्याचा शोध घ्यावा, असा तक्रार अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. स्मशानभूमी समितीतर्फे बोलताना अध्यक्ष प्रकाश कळंगुटकर यांनी माजी उपसंचालक पंचायत संचालनालय व कोमुनिदादचे व्यवस्थापक दशरथ रेडकर यांची या प्रकरणी असलेली कृती संशयास्पद असून त्याविषयी चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (वार्ताहर)