पान ४ सिमेंटवाहू ट्रक कलंडल्याने दोघे ठार
By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:39+5:302015-04-25T02:10:39+5:30
धारबांदोड्यातील घटना

पान ४ सिमेंटवाहू ट्रक कलंडल्याने दोघे ठार
ध रबांदोड्यातील घटना फोंडा : धारबांदोडाजवळील एका धोकादायक वळणावर हैदराबादहून पणसुले-तिस्क येथे प्रिया सिमेंट घेऊन येणारा ट्रक कलंडला. या अपघातात ट्रकचालक तसेच पर्यायी चालक जागीच ठार झाले. घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जी. प्रवीणकुमार (३७) आणि बी. श्रीनिवास (४८) अशी मृतांची नावे असून दोघेही हैदराबाद येथील आहेत. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायं. ४ च्या सुमारास एपी-२४-टीसी-४८८६ क्रमांकाचा सिमेंटवाहू ट्रक हैदराबाद येथून ६८0 सिमेंटच्या गोणी घेऊन पणसुले, तिस्क, उसगाव येथे निघाला होता. सुकतळी-मोले येथील पेट्रोलपंपवर ट्रकमध्ये डिझेल भरल्यानंतर ट्रकचालकाने अवघ्या काही वेळेत तिस्क येथील गोदामात पोहोचत असल्याचे मोबाईलवरून कळवले होते. मात्र, तिस्क उसगाव येथून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर भरधाव वेगातील ट्रक अपघातग्रस्त झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की संपूर्ण ट्रक रस्त्यात कलंडला तसेच झाडाला धडक बसल्याने ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. तसेच ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्ताभर विखुरल्या. अपघातात दोन्ही चालकांच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे या वेळी स्थानिकांनी सांगितले. अपघाताचे वृत्त मिळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील तसेच वाहतूक निरीक्षक नीलेश धायगोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. दरम्यान, अपघातानंतर या भागातील वाहतूक चौपदरी रस्त्याचे काम सुरू असलेल्या बगलरस्त्याने वळवण्यात आली. दरम्यान, या भागात अनेक अपघात होऊनही इथल्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच अन्य समस्यांबाबत सरकार कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.(प्रतिनिधी) -----सुदैवाने पत्रकार बचावला पणसुले-तिस्क येथे झालेल्या अपघातात कुळे येथील उमेश नाईक हा पत्रकार सुदैवानेच बचावला. हा अपघात होण्याच्या तासभरापूर्वी याच भागात आणखी एक अपघात घडला होता. या अपघाताचे वार्तांकन करून नाईक हे दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करून फोनवरून मित्राशी संवाद साधत होते. या वेळी सिमेंटवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली व तेथेच कलंडला. यात नाईक यांची जीए-0९-जे-३६३२ क्रमांकाची दुचाकी सिमेंटच्या पोत्यांखाली गाडली गेली. नशीब बलवत्तर असल्यानेच नाईक हे बचावल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. ढँङ्म३ङ्म : 2404-स्रङ्मल्ल-03कॅप्शन - धारबांदोडा येथे रस्त्यात कलंडलेला सिमेंटवाहू ट्रक. शेजारीच पत्रकार उमेश नाईक यांची दुचाकी. (छाया- शेखर नाईक)