Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:37 IST2025-06-23T11:37:10+5:302025-06-23T11:37:39+5:30
Assembly By-election Result 2025: चार राज्यांच्या रिक्त झालेल्या पाच विधानसभा मतदारसंघांत गुरुवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे.

Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
पंजाबमधील लुधियाना पश्चिम, पश्चिम बंगालमधील कालीगंज, गुजरातमधील विसावदर आणि केरळमधील निलांबूर या पाच विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे. या पाचपैकी दोन जागांवर भाजपा पुढे असून एका जागेवर आप कडवी टक्कर देत आहे.
लुधियाना पश्चिम मतदारसंघात सत्ताधारी आप उमेदवार संजीव अरोरा आघाडीवर आहेत. तर गुजरातच्या विसावदर मतदारसंघात सुरुवातीला आपचे गोपाल इटालिया यांनी आघाडी घेतली होती, आता भाजपाचे उमेदवार किरीट पटेल हे सहाव्या राऊंडनंतर केवळ ४११ मतांनी आघाडीवर आले आहेत. तर गुजरातच्या कादीमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
केरळमधील निलांबूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत आघाडीवर आहेत. परंतू ही आघाडी २१२ मतांचीच आहे. सीपीआयएमच्या एम स्वराज या पिछाडीवर आहेत. या ठिकाणीही काहीही होऊ शकते. पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलिफा अहमद आघाडीवर आहेत.
विद्यमान आमदारांच्या निधनामुळे गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाबमधील प्रत्येकी एका जागेवर या पोटनिवडणूक घेण्यात आली. तसेच आमदारांच्या राजीनाम्यामुळे केरळमध्ये आणि गुजरातमधील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक लागली होती.