पान- ३ : थोडक्यात जोड
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
तीव्र निषेध
पान- ३ : थोडक्यात जोड
तीव्र निषेधकरंजखेड : हाजी कॉ. गुलाम महमद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन भाकप राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या बैठकीस भाकपचे जिल्हा सहसचिव श्यामराव जाधव, कॉ. सुनील जाधव, कॉ. ओंकार खरात, कॉ. किसन मारकळ, सहसचिव लक्ष्मण कुच्चे, शेख इस्माईल, बाबा पी. पवार, शिवाजी पवार, लक्ष्मण वाघ, रामभाऊ कामरे, शेख नजीर शेठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.स्नेहसंमेलन साजरेअंधारी : येथील नॅशनल मराठी माध्यमिक विद्यालयात नुकतेच स्नेहसंमेलन पार पडले. उद्घाटन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी केशवराव तायडे होते. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर अब्दुल सत्तार, हरिकिशन सुलताने, अब्दुर रहीम शेख, सुनील पाटणी आदी उपस्थित होते.नागरी सत्कारदावरवाडी : पैठण येथील ताराई शिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन केदार शिंदे, मुख्याध्यापक घोरतळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.