पान 2- दोन महिलांकडून 15 लाखांचा गंडा
By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:32+5:302015-08-22T00:43:32+5:30
वास्को : दोन महिलांना संगनमत करून एका इसमास 15 लाख रुपयांना फसविल्याची तक्रार वास्को पोलिसांत नोंद झाली आहे.

पान 2- दोन महिलांकडून 15 लाखांचा गंडा
व स्को : दोन महिलांना संगनमत करून एका इसमास 15 लाख रुपयांना फसविल्याची तक्रार वास्को पोलिसांत नोंद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी रेल्वे स्टेशननजिक राहणार्या सोफिया वॉरेन पिरिश आणि नवे वाडे येथील साईबाबा मंदिराजवळ राहणार्या सेलिया साबेस्तांव रोद्रिगिज या दोन्ही महिलांनी एकमेकांशी संगनमत करून आणि एका विशिष्ट हेतूने तक्रारदार चंद्रकांत परब या चिखली येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणार्या इसमाशी दोस्ती केल्यानंतर आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तसेच रिअल इस्टेट व्यवसाय सुरू करण्याचे कारण सांगून अप्रामाणिकपणे त्याला भुरळ घातली. या दोघींनी जानेवारी 2013 ते एप्रिल 2014 या काळात त्याच्याकडून परत करण्याचे आश्वासन देऊन 15 लाख रुपये घेतले. त्यापैकी सोफिया पिरिश हिने एका नोटरीचे बनावट शिक्के, सील आणि सही केलेले एक बनावट अधिकारपत्र दिले. तसेच त्याला पुढची तारीख घालून तसेच बनावट सही केलेले काही धनादेश दिले. हे धनादेश बनावट असल्याचे कारण देऊन बँकेने नंतर ते परत केले. याबाबत वास्को पोलीस स्थानकाच्या सहाय्यक निरीक्षक नेहांदा तावारिश या चौकशी करत असून पोलिसांनी या महिलांवर भादंसं 420, 465, 465, 471 आणि 34 या कलमाखाली गुन्हा नोंदविला असून अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)