पान 2 - आज अर्जुन साळगावकरांची चौकशी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30
पणजी : आश्ने डोंगरावरील बेकायदा खाण प्रकरणात अर्जुन साळगावकर यांना बुधवारी एसआयटीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच त्यांची आणि त्यांचे बंधू समीर साळगावकर यांची चौकशी करण्यात आली होती.

पान 2 - आज अर्जुन साळगावकरांची चौकशी
प जी : आश्ने डोंगरावरील बेकायदा खाण प्रकरणात अर्जुन साळगावकर यांना बुधवारी एसआयटीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच त्यांची आणि त्यांचे बंधू समीर साळगावकर यांची चौकशी करण्यात आली होती. बेकायदा खाण प्रकरणी एसआयटीच्या तपासाला गती मिळाली असून चौकशीसाठी समन्स बजावण्याचा धडाका चालूच ठेवण्यात आला आहे. साळगावकर बंधूंपैकी अर्जुन यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, वन खात्याचे माजी प्रधान वनपाल शशीकुमार हे मंगळवारी चौकशीला एसआयटीपुढे उपस्थित राहिले नाहीत. काही कारणांमुळे येणे शक्य न झाल्याचे त्यांनी एसआयटीला कळविले असून आता ते 14 सप्टेंबर रोजी येणार असल्याचा निरोप दिला आहे. (प्रतिनिधी)