शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पान १ - मुख्य बातमी

By admin | Updated: September 11, 2015 23:45 IST

११/७ बॉम्बस्फोटप्रकरणी

११/७ बॉम्बस्फोटप्रकरणी१२ आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तताफाशी की जन्मठेप? : सोमवारपासून युक्तिवाद मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एक आरोपीची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींना काय शिक्षा ठोठावावी, यावर येत्या सोमवारपासून युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय या आरोपींची शिक्षा जाहीर करेल. अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान अशी दोषी आरोपींची नावे असून अब्दुल शेख याला पुराव्यांअभावी निर्दोष ठरविण्यात आले आहे. या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे केली जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वे गाड्यांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे बोरीवली, मिरा-भाईंदर, जोगेश्वरी, खार, वांद्रे, माहिम व माटुंगा रोड येथे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याची सुनावणीही सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकार्‍यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. तसेच जवळपास साडेपाच हजार पानांचा मजकूर असलेला पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात याची सुनावणी पूर्ण झाली. (प्रतिनिधी)................................असे घडले बॉम्बस्फोट :बोरीवली - संध्या ६.२८ -विरार फास्ट -२६ ठार -१५३ जखमीमीरा भाईंदर - संध्या ६.३१ - विरार फास्ट - ३१ ठार -१२२ जखमीजोगेश्वरी -संध्या ६.२४ -बोरीवली स्लो -२८ ठार -११५ जखमीखार रोड -संध्या ६.२५ -बोरीवली स्लो -९ ठार -१०२ जखमीवांद्रे - संध्या ६.२३ -बोरीवली सेमी फास्ट -२२ ठार -१०७ जखमीमाहिम -संध्या ६.२३ -बोरीवली सेमी फास्ट -४३ ठार -९६ जखमीमाटुंगा रोड -संध्या ६.२४ -विरार फास्ट -२८ ठार -१२२ जखमी