शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी १0 लाख लोकांनी चित्रपट पाहिल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:52 IST

उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते.

नवी दिल्ली : उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते.गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील चित्रपटगृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या दिवशी चार हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि १0 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.या चित्रपटाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.न्यायालयाचा अवमान-पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अ‍ॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर २९ जानेवारीला सुनावणी आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन रा. स्व. संघाच्या वायव्य विभागाचे प्रमुख भगवती प्रकाश यांनी केले. त्यामुळे या आंदोलनामागे भाजपा व संघ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.मुंबईत शांतता : ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सिनेमागृहांबाहेर बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे मुंबईतील १४० स्क्रीनवर चित्रपटाचे शो शांततेत पार पडले. मुंबईत या चित्रपटाच्या तिकीटाचे दर ३०० ते २५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.गुरगावमध्ये शाळेच्या बसवर करणी सेनेने जो हल्ला चढविला त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुस्लीम, दलितांवरहल्ले होताना शांत बसणारे लोक आता मुलांवर हल्ले करायला लागले असून आता मात्र गप्प राहणे परवडणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावती