शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची गाडी, हातात झाडू... लोकांनी म्हटलं वेडं; माजी IPS इंद्रजीत सिद्धू यांना पद्मश्री पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:15 IST

Inderjeet Singh Sidhu : ८८ वर्षांचे इंद्रजीत सिंग सिद्धू निवृत्तीनंतर अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत आहेत. चंदीगडचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि 'सुंदर शहर' हा टॅग जपण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आहे.

माजी आयपीएस (IPS) अधिकारी इंद्रजीत सिंग सिद्धू यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ८८ वर्षांचे इंद्रजीत सिंग सिद्धू निवृत्तीनंतर अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत आहेत. चंदीगडचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि 'सुंदर शहर' हा टॅग जपण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आहे. १९९६ मध्ये ते पंजाब पोलीस दलातून उपमहानिरीक्षक (DIG) पदावरून निवृत्त झाले. 

निवृत्तीच्या तीन दशकांनंतरही ते चंदीगडच्या सेक्टर ४९ मधील आपल्या परिसराची स्वच्छता करत आहे. दररोज सकाळी सहा वाजता ते रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी बाहेर पडतात. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.  म्हणून त्यांनी हे स्वतः करण्याचं ठरवलं. स्वच्छता करण्यात कोणतीही लाज नाही असं ते म्हणतात.

सिद्धू यांनी कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी बॅग किंवा रिक्षाचा वापर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा त्यांचा एकट्याचा प्रयत्न होता. काही लोकांनी त्यांना 'वेडं' देखील म्हटलं, पण हळूहळू त्याचे रूपांतर एका चळवळीत झालं. सिद्धू यांचे कुटुंब आणि सहकारी रहिवासी आता त्यांच्या कामात त्यांना पाठिंबा देतात. 'स्वच्छ भारत सर्वेक्षण'मध्ये चंदीगडने प्रथम क्रमांक मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे असे सिद्धू म्हणतात.

जर तुम्ही परदेशात गेलात तर तिथले रस्ते अगदी स्वच्छ असतात. आपले रस्ते तसे का असू शकत नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण समाजात मोठं योगदान देत आहोत असं सिद्धू यांना वाटत नाही, परंतु यामुळे आपल्याला खोलवर समाधान मिळते, असं त्यांनी सांगितलं. "मला स्वच्छ जागा आवडते, म्हणून मी साफसफाई करतो. जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत मी हे काम करत राहीन" असंही म्हटलं आहे. इंद्रजीत सिंग सिद्धू गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लोक त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-IPS Officer's Street Cleaning Earns Him Padma Shri Award

Web Summary : Former IPS officer Indrajeet Singh Sidhu, 88, awarded Padma Shri for his selfless dedication to cleaning Chandigarh's streets post-retirement. Despite initial skepticism, his efforts inspired a cleanliness movement, supported by his family and community, aiming for a 'Clean India' win.