शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Padmaavat Controversy : वाराणसीत सिनेमागृहाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:41 IST

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा वादविवादांमध्ये चार राज्य वगळता देशभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा वादविवादांमध्येच चार राज्य वगळता देशभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांसहीत हा सिनेमा 6 ते 7 हजार स्क्रीन्सवर झळकला आहे. दरम्यान, सिनेमाला विरोध करणा-या करणी सेनेनं देशव्यापी बंदची हाक दिली केली आहे.  वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलनं सुरू आहेत. 

देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन ऑफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत. 

पाटणा वगळता बिहारमध्ये सर्वत्र सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.  करणी सेना आणि  राजपूत संघटनांसंबंधित लोकांकडून रिलीजच्या दिवशीदेखील सिनेमाविरोधात हिंसक आंदोलन सुरूच आहेत. 

वाराणसीमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न वाराणसीमध्ये पद्मावत सिनेमाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान सिगरा येथील आयपी मॉलबाहेर एक तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पंजाबमधील राजपूतांनी पाहिला 'पद्मावत'; चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, विरोध मागे घेण्याचं आवाहनपंजाबमधील राजपूत महासभाने 'पद्मावत' चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला आहे. बुधवारी राजपूत समाजाशी संबंधित काही लोकांनी पठाणकोटमध्ये स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान 'पद्मावत' चित्रपट पाहिला. जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. राजपूत महासभा आतापर्यंत या चित्रपटाचा विरोध करत होती, ज्यामुळे चित्रपटात 300 हून अधिक सीन्सवर कात्री चालवण्यात आली. चित्रपट पाहिल्यानंतर राजपूत महासभाचे अध्यक्ष दविन्दर दर्शी यांनी सांगितलं की, 'याआधी आम्ही चित्रपटाचा विरोध करत होतो, ज्यामुळे चित्रपट बनवणा-यांना 300 कट्स करावे लागले'. 

'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'राजपूत समाजाच्या 30 नेत्यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर हा चित्रपट पाहिला असून, आता यामध्ये कोणताच वाद नाही', असंही ते बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मोठ्या संख्येने शिख आणि हिंदू राजपूत पठाणकोट, होशियारपूर आणि गुरुदासपूर जिल्ह्यात वसले आहेत'. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संघटनेच्या शाखा आणि पदाधिकारी दुस-या जिल्ह्यांतही आहेत आणि आता चित्रपटाशी संबंधित कोणताच वाद उरलेला नाही. राजपूत समाजाशी संबंधित काही काँग्रेस नेत्यांनीही हा वाद सोडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

 पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला देशभरात करणी सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. विरोधाच्या नावाखाली ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे भन्साळींचा पद्मावत पाकिस्तानातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. आपल्या सेन्सॉन बोर्डनं सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिलंय तर पाकिस्तानानं पद्मावतला यू सर्टिफिकेट दिले आहे.

करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी

करणी सेनेने चित्रपटाची तिकीटविक्री करणा-या कंपनी BookmyShow ला देखील धमकी दिली आहे. 'पद्मावत चित्रपटाची तिकीटविक्री बंद करा अन्यथा विक्री करण्याच्या लायकीचं ठेवणार नाही', अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. 

4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखलसुप्रीम कोर्टाने पद्मावत संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिलेला असतानाही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही.  या राज्यांमध्ये पद्मावतविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यामुळे सुप्रीम कोर्टात या राज्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अपयश आल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबत न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी करणी सेनेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्लालज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला.  मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

टॅग्स :Padmavatपद्मावतSuicideआत्महत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीKarni Senaकरणी सेना