अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 02:52 PM2020-09-24T14:52:06+5:302020-09-24T14:58:20+5:30

डॉ. बसु यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कोरोना शिवाय किडनीच्या अजारानेही त्रस्त होते, असे पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.

Padma Shri nuclear Scientist Dr. Shekhar Basu dies due to corona | अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचे कोरोनामुळे निधन

अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचे कोरोनामुळे निधन

Next
ठळक मुद्देडॉ. बसु यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. बसू, हे मेकॅनिकल इंजिनिअर होते.देशाच्या अणु उर्जा कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान होते.

कोलकाता - अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर बसू यांचे गुरुवारी सकाळी 4.50 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते.

डॉ. बसू यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कोरोना शिवाय किडनीच्या अजारानेही त्रस्त होते, असे पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.

डॉ. बसू, हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुउर्जा कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण अशी अणुभट्टीही तयार केली होती.

Web Title: Padma Shri nuclear Scientist Dr. Shekhar Basu dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.