पी चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हंटलं 'थँक्यू गुजरात', वाचा नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 13:53 IST2017-11-11T13:48:53+5:302017-11-11T13:53:39+5:30

 सरकारने 200 पेक्षा जास्त वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'थँक्यू गुजरात' असं ट्विट केलं.

P Chidambaram wrote in the tweet 'Thank You', the reasons for the read | पी चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हंटलं 'थँक्यू गुजरात', वाचा नेमकं कारण

पी चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हंटलं 'थँक्यू गुजरात', वाचा नेमकं कारण

ठळक मुद्दे  सरकारने 200 पेक्षा जास्त वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'थँक्यू गुजरात' असं ट्विट केलं. पी. चिंदबरम यांनी ट्विट करत केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 

नवी दिल्ली-  सरकारने 200 पेक्षा जास्त वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 'थँक्यू गुजरात' असं ट्विट केलं. पी चिंदबरम यांनी ट्विट करत केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी केलेलं हे ट्विट सूचक मानलं जात आहे. निवडणूका असलेल्या राज्यातील जीएसटीमुळे त्रस्त असणाऱ्या व्यापारांना खूश करण्यासाठी जीएसटी कमी करण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली आहे. पी.चिदंबरम यांच्या ट्विटचा रोखही तसाच होता, असंही बोललं जातं आहे.

'गुजरातला धन्यवाद! जे संसदेला जमलं नाही. जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं,' असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी 210 वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा दर घटविण्याचा निर्णय घेतला. याआधी गेल्या महिन्यात सरकारने जीएसटी कौन्सिलने 27 उत्पादनावरील टॅक्स कमी केला होता. यातील काही उत्पादन गुजरातच्या इंडस्ट्रीसाठी महत्त्वाची होती. 


'जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित असावा, अशी काँग्रेसची सुरुवातीपासूनची भूमिका होती. शेवटी तीच मान्य झाली. माझं म्हणणं खरं ठरलं. उशिरा का होईना सरकारला समज येऊ लागली आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसची पुढची लढाई समान दरासाठी असेल,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
 



 

Web Title: P Chidambaram wrote in the tweet 'Thank You', the reasons for the read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.