P. Chidambaram Arrested Live: CBI will appear P. Chidambaram in court today | P. Chidambaram Arrested :पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी
P. Chidambaram Arrested :पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, विरोधी पक्षांकडूनही या अटकेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्यावर रात्रभर प्रश्नांची सरबत्ती केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

06:43 PM

३० मिनिटे कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्यास न्यायालयाने दिली मुभा 

नवी दिल्ली - पी. चिदंबरम यांना दरदिवशी ३० मिनिटे कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्यास न्यायालयाने दिली मुभा 

06:40 PM

पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली - पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी 

05:05 PM

आयएनएक्स प्रकरण: सीबीआय कोर्टाने निर्णय राखून ठेवला

आएनएक्स प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांची 5 दिवसांसाठी कस्टडी मागितली आहे, कोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला 

04:49 PM

सीबीआयची वर्तवणूक चुकीची - अभिषेक मनु सिंघवी

या संपूर्ण प्रकरणात सीबीआयची वर्तवणूक चुकीची आहे. 11 महिने सीबीआयने चौकशीसाठी बोलविले नाही. सीबीआयने रिमांडची मागणी केली मात्र आरोप काय आहेत? हे सांगितले जात नाही. FIPB चे 6 आरोपी आतापर्यंत अटक नाही केली. 

04:29 PM

चिदंबरम यांच्या बचावासाठी कपिल सिब्बल कोर्टात मांडतायेत बाजू

कोर्टात कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांची बाजू मांडताना सांगितले की, कार्ती चिंदबरम, भास्कर रमन यांच्यावर या प्रकरणात आरोप आहे. त्यांना अतंरिम जामीन मिळाला आहे. 

02:25 PM

पी. चिदंबरम यांना थोड्याच वेळात सीबीआय कोर्टात हजर करणार

सीबीआय चिदंबरम यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी कोर्टात करण्याची शक्यता 

02:25 PM

पी. चिदंबरम यांना सीबीआय कोर्टासमोर केले हजर

आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्यावर कारवाई 

02:15 PM

चिदंबरम यांना झालेली अटक हे सुडाचे राजकारण, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांचा आरोप

12:23 PM

चिदंबरम यांच्याबाबतचा कोर्टाचा निर्णय कायद्यानुसार, त्यात सरकारची भूमिका नाही - जी. किशन रेड्डी

10:41 AM

भाजपाने सीबीआय आणि ईडीचे रूपांतर सूड घेणाऱ्या संस्थांमध्ये केले, काँग्रेसचा आरोप

10:21 AM

चिदंबरम यांच्या अटकेविरोधात जंतर मंतरवर आंदोलन करणार - कार्ती चिदंबरम

माझ्या वडिलांनाच नव्हे तर काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी मी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी जात आहे  

09:50 AM

चिदंबरम कायद्याचे जाणकार आहेत, कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी असे वर्तन करता कामा नये होते - सत्यपाल सिंह

09:49 AM

चिदंबरम यांच्या अटकेवर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया

जे घडले ते दु:खद आहे, यामध्ये कायद्याप्रति उत्तरदायित्वासारखे काही नव्हते. हे प्रकरण शुक्रवारसाठी लिस्टेड होते. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय करू इच्छिते हे पाहण्यासाठी वाट पाहिली पाहिजे होती. 

09:14 AM

कलम 370 वरून लक्ष हटवण्यासाठी केली पी. चिदंबरम यांना अटक, कार्ती चिदंबरम यांचा आरोप

09:13 AM

कार्ती चिदंबरम चेन्नईहून दिल्लीकडे रवाना

English summary :
P. Chidambaram Arrest Live Update: Former Home Minister and senior Congress leader P. Chidambaram was arrested on Wednesday night (21 August 2019) in connection with INX case. His supporters have reacted sharply after Chidambaram was arrested. They will be produced in court today.


Web Title: P. Chidambaram Arrested Live: CBI will appear P. Chidambaram in court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.