P Chidambaram : अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 22:22 IST2022-05-04T22:20:05+5:302022-05-04T22:22:47+5:30
P Chidambaram Against Adhir Ranjan Chaudhari: कोलकाता उच्च न्यायालयात काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता सरकारविरोधात जनहितयाचिका दाखल केली आहे.

P Chidambaram : अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग...
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम बुधवारी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता हायकोर्टात गेले होते. मात्र, त्यांना काँग्रेसच्या कायदा विंगच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. आम्ही तुमच्यावर थुंकतो, अशा शब्दांत पी चिदंबरम यांना विरोध सहन करावा लागला. तसेच काळे झेंडे दाखवत गो बॅकचे नारे देण्यात आले.
कोलकाता उच्च न्यायालयात काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता सरकारविरोधात जनहितयाचिका दाखल केली आहे. या याचिकेवर युक्तीवाद करण्यासाठी चिदंबरम तिथे गेले होते. परंतू चिदंबरम चौधरींच्या बाजुने नाही तर त्यांच्या विरोधात युक्तीवाद करण्यासाठी गेले होते. यामुळे तिथे त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विरोध झेलावा लागला.
मेट्रो डेअरीचे शेअर ममता सरकारने विकले आहेत. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते अधीर रंजन तौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. याविरोधात लढण्यासाठी ममता सरकारने चिदंबरम यांची नियुक्ती केली. चिदंबरम यांची गाडी काँग्रेस समर्थक वकिलांनी हायकोर्टाच्या गेटवरच रोखली. काळे झेंडे दाखविले, तसेच टीएमसीचा दलाल असे संबोधत आम्ही तुमच्यावर थुंकतो, अशा शब्दांत विरोध केला.
चिदंबरम म्हणाले...मी काही बोलणार नाही...
यावर चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना हे एक व्यावसायिक जग आहे. कोणालाही त्याचापर्याय निवडण्याचा अधिकार आहे. ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. कोणीही त्याला आदेश देऊ शकत नाही, असे म्हटले. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक होती असेही ते म्हणाले. तर चिदंबरम यांनी हा एक स्वतंत्र देश आहे, मी यावर काही बोलणार नाही, मी यावर का काही बोलावे? असे म्हटले.