Corona Vaccine: मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरी

By कुणाल गवाणकर | Published: January 1, 2021 05:43 PM2021-01-01T17:43:17+5:302021-01-01T17:58:57+5:30

Corona Vaccine: ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीचा निर्णय

Oxford COVID 19 vaccine Covishield approved for emergency use in India | Corona Vaccine: मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरी

Corona Vaccine: मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरी

Next

नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांना मोठी बातमी मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशील्ड लसीचा वापर भारतात सुरू होईल. तशी परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीनं घेतला आहे. ब्रिटिश सरकारनं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. 

ब्रिटन हा ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीला परवानगी देणारा पहिली देश ठरला. ब्रिटननं याच आठवड्यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. त्यामुळे भारतातही ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी सीरमशी करार केला आहे. सीरमनं आतापर्यंत लसीचे ५ कोटी डोज तयार केले आहेत. भारतात ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध होईल.

सीरमची लस साठवण्यास सोपी
कोरोनाची लस विशिष्ट तापमानात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तिची परिणामकारकता कमी होऊ शकते. सीरमच्या कोविशील्ड सोबत फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसी स्पर्धेत होत्या. मात्र फायझरची लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. तर मॉडर्नाची लस साठवण्यासाठी डीप फ्रीजरची आवश्यकता असते. ऑक्सफर्डची लस मात्र सामान्य फ्रीजमध्येदेखील ठेवता येऊ शकते.

भारतासारख्या खंडप्राय देशासाठी कोरोना लसींचं उत्पादन करणं आणि त्यांचं वितरण करणं आव्हानात्मक आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकानं लसीच्या उत्पादनासाठी सीरमसोबत करार केला. पुण्यात मुख्यालय असलेली सीरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतातच लसींचं उत्पादन होत असल्यानं वितरण जास्त सुलभ होईल. देशात पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस टोचण्यात येणार आहे.

उद्यापासून देशातील प्रत्येक राज्यात 'ड्राय रन'
देशातील प्रत्येक राज्यात उद्या २ जानेवारीपासून 'ड्राय रन' करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Oxford COVID 19 vaccine Covishield approved for emergency use in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.