"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:04 IST2025-01-17T17:03:46+5:302025-01-17T17:04:53+5:30
दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.

"ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक" - राजा भैया
हैदराबादमधील एक नेता म्हणाला होता की १५ मिनिटांसाठी पोसील हटवा, मग समजेल. जर आपण गांभीर्याने विचार केला तर तो नेता, जे म्हणाला, ते काही अंशी बरोबरच म्हणाला. जर असे झाले तर जवळजवळ अर्धे हिंदू एकाच झटक्यात नष्ट होतील. तसे पाहिले, तर आपल्याकडे आहे काय? ना आपण आपली आपण वंश वृद्धी करत आहोत, ना शस्त्रे संचय," असे कुडाचे आमदार राजा भैया यांनी म्हटले आहे. ते महाकुंभमेळ्यात बोलत होते.
दिव्य प्रेम सेवा मिशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आज हिंदू समाजाला बऱ्याच वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. याशिवाय, आपल्या अस्तित्वासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.
राजा भैया पुढे म्हणाले, "शास्त्रे संरक्षण देऊ शकत नाहीत हे खरे आहे. संस्कृतींचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे आवश्यक आहेत. तक्षशिला नष्ट झाली नसती. एका दरोडेखोराने नालंदाला आग लावली. तेथे काही महिने पुस्तके जळत राहिली. जेव्हा जेव्हा देवाने अवतार घेत, तेव्हा तेव्हा त्यांनी शस्त्र धारण केले. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात गेले तेव्हा त्यांनी सर्व काही सोडले, पण शस्त्रे सोबत घेतली. जेव्हा आपण मातेची पूजा करतो तेव्हा ती देखील शस्त्रधारी असते. हनुमानजींच्या हातून कधी गदा सुटली नाही आणि शिवशंकरांच्या हाती नेहमीच त्रिशूल असतो. धर्मग्रंथ आपल्याला कधी काय वापरायचे हे सांगतात, पण ते शस्त्रास्त्रे सोडायला सांगत नाहीत. पण हिंदू काय करत आहेत हा विचार करण्यासारखा विषय आहे. ते त्यांचा वंश ही वाढवत नाहीत आणि त्यांच्याकडे शस्त्रेही नाहीत.
ते पुढे म्हणाले, "मूर्ती विसर्जनादरम्यानही हल्ले होतात, हे आपण बघतो. आपण कुणालाही काही केले नाही. जर कोणी भारतात आश्रय मागितला तर त्याला तो मिळाला. आमची अट अशी नव्हती की तुम्ही तुमचा धर्म बदलला तरच हे होईल. मुस्लिम, ज्यू आणि तिबेटीय, या सर्वांना भारताने आश्र दिला. यावर कोणत्याही भारतीयाचा आक्षेप नव्हता. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही म्हणता की, जो माझा देव आहे, त्यालाच मानावे लागेल. जर तुम्ही हे केले नाही, तर तुम्हाला मारले जाईल, दहशतवादी हल्ले होतील. असे हल्ले काशी, प्रयाग, अक्षरधामवर असोत अथवा भारताच्या संसदेवर अशोत." पुढे जनसत्ता दलाचे नेते म्हणाले, "धर्माच्या नावाखाली हिंदूंसोबत जेवढी लूटमार झाली, जेवढे बलात्कार आणि हत्या झाल्या, तेवढे इतर कुणासोबतही झाले नाही. यावर सर्वजण सहमत असतील. आम्ही शस्त्रे सोडली आणि कुटनितीच्या नावाखाली जाती-जातींमध्ये विभागले गेले.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, भारतातील अनेक लोकांनी त्यांचे साम्राज्य रक्षण करण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी लढा दिला, पण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची आवश्यता आहे. तसेच शस्त्र बाळगणे आवश्यक आहे आणि जर आज देश सुरक्षित असेल तर तो सैन्यामुळेच आहे. आपण एक प्राचीन देश आहोत आणि आपण खूप ज्ञानी आहोत म्हणून नाही. आज जर इस्रायल टिकून आहे तर तो केवळ त्याच्या सशस्त्र बळामुळेच आहे, असेही ते म्हणाले.