हैदराबादमध्ये रविवारी एका अलिशान फरारी कारला भीषण अपघात झाला. या ४ कोटी रुपयांच्या फरारीने तिघांना चिरडले. हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जुबली हिल्स परिसरातील रोड क्रमांक ४५ जवळ घडला. हा भाग टॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांच्या निवासस्थानाजवळच आहे.
कसा झाला अपघात? -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा कारवरील नितंत्रण सुटले आणि कार विजेच्या खांबाला जाऊन आदळला. यानंतर ती विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक कारला धडकली. याशिवाय, कारच्या मागे असलेल्या अनेक वाहनांनाही अपघात झाला. अद्याप फेरारी चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही.
फेरारी वेंकट राजा रेड्डी यांच्या नावावर -या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित फेरारी वेंकट राजा रेड्डी यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कार नेमकी कोण चालवत होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.
चालकाची अल्कोहोल चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालक एका लग्न समारंभासाठी जात होता. दरम्यान, वाहतूक अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. सुरुवातीच्या अहवालात ब्रेक आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.
Web Summary : A Ferrari accident in Hyderabad injured three people near actor Balakrishna's house. The driver lost control, hitting a pole and other vehicles. The car is registered to Venkat Raja Reddy. Initial reports suggest a mechanical failure may be to blame.
Web Summary : हैदराबाद में एक फरारी दुर्घटना में अभिनेता बालकृष्ण के घर के पास तीन लोग घायल हो गए। चालक ने नियंत्रण खो दिया, जिससे एक खंभा और अन्य वाहन टकरा गए। कार वेंकट राजा रेड्डी के नाम पर पंजीकृत है। प्रारंभिक रिपोर्टों से यांत्रिक विफलता का संकेत मिलता है।