शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिअल इस्टेटला घरघर; ८ वर्षांपासून देशातील २.२ लाख घरांचं बांधकाम रखडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 10:03 IST

रखडलेल्या घरांचं एकूण मूल्य १.५६ लाख कोटी

नवी दिल्ली: देशाच्या ७ प्रमुख शहरांमधील २.२ लाख घरांचं बांधकाम २०११ पासून रखडलं आहे. या घरांची एकूण किंमत १.५६ लाख कोटी रुपये आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट जेएलएल इंडियानं देशातील रखडलेल्या घरांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दिल्ली-एनसीआरमधील रिअल एस्टेट प्रकल्पांची काम अतिशय संथ गतीनं सुरू आहेत. देशातील रखडलेली ७१ टक्के घरं दिल्ली-एनसीआर भागातील आहेत. देशाच्या ७ प्रमुख शहरांमधील एकूण २,१८,३६७ घरांचं बांधकाम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. या घरांचं एकूण मूल्य १,५५,८०४ कोटी रुपये आहे. दिल्ली-एनसीआरसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद आणि पुणे या शहरांमधील घरांची बांधकामंदेखील रखडली आहेत. रखडलेल्या २.२ लाख घरांपैकी जवळपास ३० हजार घरांशी संबंधित प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील १,५४,०७५ घरांचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. या घरांची एकूण किंमत ८६,८२४ कोटी रुपयांच्या घरात आहे. तर मुंबईत ५६,४३५ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ४३,४४९ घरांची कामं अपूर्ण आहेत. जेएलएलच्या आकडेवारीनुसार, देशातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी ९१ टक्के प्रकल्प मुंबई, दिल्ली-एनसीआरमधील आहेत. चेन्नईतील ८,१३१ घरांचं बांधकाम रखडलं आहे. त्यांचं मूल्य ४,४७४ कोटी रुपये आहे. तर बंगळुरूमधील ५,४६८ घरांची काम संथ गतीनं सुरू असून त्यांची किंमत २,७६८ कोटी रुपये इतकी आहे. पुण्यातील ४,७६५ घरांचं काम रखडलं आहे. त्यांचं बाजारमूल्य ३,७१८ कोटी रुपये आहे. हैदराबादमधील २,०९५ घरांचं काम बांधकाम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. या घरांची एकूण किंमत १,२९७ कोटी रुपये आहे. तर कोलकातामधील ३८४ घरांचं काम रखडलं आहे. त्यांची किंमत २२८ कोटी रुपये आहे.  

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग