शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

श्वास गुदमरतोय! भारतात वायू प्रदूषणामुळे एकाच वर्षात 12 लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:50 IST

वायू प्रदूषणाचा भारत आणि चीनला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली: वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांनी जीव गमावला. त्यातील निम्मे मृत्यूभारत आणि चीनमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडी या संस्थांनी वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या जीवितहानीची आकडेवारी प्रसिद्ध केली. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांचा प्राण गेला. यातील जवळपास 12 लाख लोक भारताचे आहेत. भारत आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अहवालात आहे. यामध्ये घरात होत असलेल्या वायू प्रदूषणाचादेखील समावेश आहे. दक्षिण आशियातील वायू प्रदूषणाचं संकट अतिशय भीषण असल्याचं अहवाल सांगतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेत असलेल्या मुलांचं सरासरी आयुष्य दीड वर्षांनी कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 

वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा वाढतच असल्याचं वास्तव अहवालातून अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेलं आहे. दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं अहवाल सांगतो. देशातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायू प्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो. कुपोषण, मद्यसेवन आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणDeathमृत्यूchinaचीनIndiaभारत