Coronavirus: देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 05:31 IST2022-01-23T05:31:01+5:302022-01-23T05:31:44+5:30

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे.

over 10000 omicron patients in the country corona 3 lakh 37 thousand new patients 488 died | Coronavirus: देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू

Coronavirus: देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण सापडले व ४८८ जणांचा मृत्यू झाला. तर, सक्रिय रुग्णांचा आकडा २१ लाख १३ हजारांवर पोहोचला आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांना कोरोना

- माजी पंतप्रधान व जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देवेगौडा यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
 

Web Title: over 10000 omicron patients in the country corona 3 lakh 37 thousand new patients 488 died