Shocking: संतापजनक प्रकार! हॉलतिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो, परीक्षा केंद्रावर जायचं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:53 IST2026-03-12T12:51:55+5:302026-03-12T12:53:59+5:30

नोकरीसाठी ४ वर्षे वाट पाहिली, अभ्यास केला... पण जेव्हा हॉल तिकीट हातात आले, तेव्हा समोर जे दिसले त्याने उमेदवाराच्या पायाखालची जमीनच सरकली!

Outrageous! A dog's photo instead of the candidate's name on the hall ticket, how to get to the exam center? | Shocking: संतापजनक प्रकार! हॉलतिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो, परीक्षा केंद्रावर जायचं कसं?

Shocking: संतापजनक प्रकार! हॉलतिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो, परीक्षा केंद्रावर जायचं कसं?

बिहारमधील सरकारी भरती प्रक्रियेतील ढिसाळ कारभाराचा एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. रोहतास जिल्ह्यातील एका उमेदवाराने दिवाणी न्यायालयातील शिपाई पदासाठी अर्ज केला होता, मात्र जेव्हा त्याचे प्रवेशपत्र हाती आले, तेव्हा त्यावर उमेदवाराच्या जागी चक्क एका कुत्र्याचा फोटो लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेवर टीकेची झोड उठत आहे.

बिक्रमगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धावा गावातील रहिवासी रितेश कुमार यांनी २०२२ मध्ये दिवाणी न्यायालयात शिपाई पदासाठी अर्ज भरला होता. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, २०२६ मध्ये या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले. रितेश यांनी मोठ्या आशेने इंटरनेटवरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड केले, मात्र ते पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. प्रवेशपत्रावर रितेश यांचे नाव, पत्ता आणि इतर सर्व शैक्षणिक माहिती अचूक आहे. परंतु, फोटोच्या जागी रितेश यांच्याऐवजी एका कुत्र्याचा फोटो छापून आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठीची लेखी परीक्षा १५ मार्च रोजी होणार आहे. रितेश कुमार यांचे परीक्षा केंद्र सहरसा जिल्ह्यात आहे. प्रवेशपत्रावर चुकीचा फोटो असल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार की नाही? असा प्रश्न रितेशला पडला आहेत. त्यांनी तातडीने भरती मंडळ आणि संबंधित विभागाकडे तक्रार केली असून, नवीन दुरुस्त केलेले प्रवेशपत्र देण्याची मागणी केली आहे.

राकेश कुमार काय म्हणाला?

"मी पहिल्यांदा पाहिले, तेव्हा मला वाटले की डाऊनलोड करताना काही तांत्रिक चूक झाली असेल, पण पुन्हा तपासल्यावर तोच फोटो दिसत होता. चार वर्षे वाट पाहिली आणि आता हा असा प्रकार समोर आला आहे. जर ही चूक वेळेत दुरुस्त झाली नाही, तर माझे करिअर धोक्यात येऊ शकते. प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी."

बिहारमध्ये अशा चुकांची मालिकाच

बिहारमध्ये सरकारी कागदपत्रांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर त्रुटी आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक उमेदवारांच्या जात, उत्पन्न किंवा निवास प्रमाणपत्रांवर प्राण्यांचे किंवा सेलिब्रिटींचे फोटो छापले गेल्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ऑनलाइन अर्ज प्रणाली आणि डेटा मॅनेजमेंटच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title : हैरानी! हॉल टिकट पर कुत्ते की तस्वीर; उम्मीदवार ने परीक्षा में प्रवेश पर सवाल उठाया।

Web Summary : बिहार के एक उम्मीदवार के हॉल टिकट पर उसकी तस्वीर की जगह कुत्ते की तस्वीर छपी है। आवेदक को परीक्षा केंद्र में प्रवेश से वंचित होने का डर है। उसने अधिकारियों से तत्काल सुधार की मांग की है, बिहार की दस्तावेज़ प्रसंस्करण में प्रणालीगत त्रुटियों पर प्रकाश डाला है।

Web Title : Outrage! Dog's photo on hall ticket; candidate questions exam access.

Web Summary : Bihar candidate's hall ticket features a dog's picture instead of his. The applicant fears denied entry to the exam center. He seeks immediate correction from authorities, highlighting systemic errors in Bihar's document processing.