गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे अभिमुखता कार्यक्रम

By Admin | Updated: August 25, 2015 22:23 IST2015-08-25T22:23:21+5:302015-08-25T22:23:21+5:30

नाशिक : गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शनिवारी (दि. २२) अभिमुखता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेची भूमिका व पालकांची जबाबदारी या बाबतचे मार्गदर्शन विकासासाठी संस्थेची भूमिका व पालकांची जबाबदारी या बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

An orientation program at Guru Gobind Singh Polytechnic | गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे अभिमुखता कार्यक्रम

गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतन येथे अभिमुखता कार्यक्रम

शिक : गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शनिवारी (दि. २२) अभिमुखता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेची भूमिका व पालकांची जबाबदारी या बाबतचे मार्गदर्शन विकासासाठी संस्थेची भूमिका व पालकांची जबाबदारी या बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला गुरू गोविंद सिंग संस्थेचे अध्यक्ष गुरुदेवसिंग बिर्दी, सचिव बलबीरसिंग छाब्रा व कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग धिंडसा यांनी सर्व पालकांचे स्वागत केले. संस्थेच्या कार्यपरंपरेची माहिती प्राचार्य पुनितसिंग दुग्गल यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख प्रा. डी. एस. वेलकर, प्रा. एस.ए. कोल्हे, प्रा. सी. डी. पाटील, प्रा. पी. जी. चव्हाण, प्रा. एस. एम. मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व शाखांमधील गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय असणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तंत्रनिकेतनचे प्रबंधक सी. के. पाटील यांनी शासनाकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख एस. एस. पाटील व सहकार्‍यांनी श्रम घेतले.
------

Web Title: An orientation program at Guru Gobind Singh Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.