जमिनींच्या नोंदीबाबत चौकशीचे आदेश
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
श्रीरामपूर : बेलापूर येथील अस्तित्वात नसलेल्या जमिनींच्या नोंदीसंदर्भात १२ आठवड्यात चौकशी करून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.

जमिनींच्या नोंदीबाबत चौकशीचे आदेश
श रीरामपूर : बेलापूर येथील अस्तित्वात नसलेल्या जमिनींच्या नोंदीसंदर्भात १२ आठवड्यात चौकशी करून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.बेलापूरचे डॉ. रमेश गंगवाल यांच्या मालकीची बेलापूर ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक २४९/४, ग्रामपंचायत मिळकत क्र. ११३८/८ व ११३८/५ अशा मिळकती आहेत. घराशेजारी मिळकत ११३८/७ ही थोरला मुलगा डॉ. प्रशांत यांच्या नावावर व ताब्यात आहे. त्यांच्या धाकट्या मुलाने कर्मयोगी मुरलीधर खटोड पतसंस्थेकडील एका कर्ज प्रकरणात अस्तित्वात नसलेली मिळकत क्रमांक ११३८/६/१ व प्रशांत यांच्या नावावरील मिळकत ११३८/७ व डॉ. रमेश गंगवाल यांच्या नावावरील मिळकत क्र. ११३८/७ रेकॉर्डसह दाखविण्यात आली. या नोंदी बेकायदेशीर असल्याची हरकत डॉ. रमेश यांनी ग्रामपंचायत, श्रीरामपूर पंचायत समिती व जिल्हाधिकार्यांकडे घेतली. तेथे न्याय न मिळाल्याने अखेर खंडपीठात याचिका दाखल केली.तिची न्या. पी. आर. बोरा व न्या. बी. पी. धर्माधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी याप्रकरणी १२ आठवड्यात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. शिवराज कडू व हेमंत थोरात यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)