शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

भड यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

खोट्या दस्तऐवजावर

खोट्या दस्तऐवजावर
आदर्श शिक्षक पुरस्कार
न्यायदंडाधिकारी : भड यांच्याविरुद्धच्या तक्रारीची चौकशी करा
नागपूर : बेझनबाग येथील गुरू नानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक अशोक भड यांनी खोटे दस्तऐवज सादर करून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला आणि शासनाची फसवणूक केली, असा आरोप करणाऱ्या एका दाखल फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात अहवाल मागितला आहे. चौकशीदरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याकडून आरोपाशी संबंधित माहिती गोळा करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
शंकरराव धवड पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक व टेलिकॉम्युनिकेशन विभागाचे निष्कासित झालेले प्रमुख हेमंत दारव्हेकर यांनी हा खटला दाखल केला. खटल्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार भड यांना २००३ मध्ये आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला. वास्तविक हा पुरस्कार प्राथमिक आणि माध्यमिक प्रवर्गातील शिक्षकांनाच देण्यात येतो. भड हे उच्च माध्यमिक प्रवर्गात सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. ते अकरावी आणि बारावीला जीवशास्त्र शिकवतात.
आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दोन वेतनवाढ मिळत असते. त्यानुसार त्यांना वार्षिक ६० हजार रुपये मिळाले. आतापर्यंत त्यांना सहा ते सात लाख रुपये मिळाले. त्यांनी बनावट दस्तऐवजावर हा पुरस्कार प्राप्त करून सहा-सात लाखांनी फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या १२०-ब, ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१ या कलमांतर्गत खटला चालविण्यात यावा, अशी प्रार्थना दारव्हेकर यांनी आपल्या फौजदारी अर्जात केली आहे. न्यायालयात दारव्हेकर यांच्यावतीने ॲड. योगेशकुमार गोरले हे काम पाहत आहेत.