मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द
म नवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्दऔरंगाबाद : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्तीचा २७ डिसेंबर २०१४ रोजीचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविला.मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी काढले होते. या आदेशाला कृउबाचे चेअरमन पंढरीनाथ मुंजाजीराव चोखट यांनी ॲड. आर. जे. निर्मल यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती सुनील पी. देशमुख यांच्यासमोर १२ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. कोणतेही कारण न सांगता जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून कृउबावर प्रशासक नियुक्त केला. संचालक मंडळाचा कालावधी जानेवारी २०१४ मध्ये संपला आहे. असे असले तरी शासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे संचालक मंडळास मुदतवाढ दिलेली आहे. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुका घेण्यास तयार आहे. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका मंजूर केली आणि कृउबावर प्रशासक नियुक्त करण्याचे उपनिबंधकांचे आदेश रद्दबातल केले. पुढील निवडणुका होईपर्यंत संचालक मंडळाला पदावर राहण्यास परवानगी दिली. वेतन सोडून दुसरा खर्च नकोकर्मचार्यांच्या वेतनाशिवाय कोणताही खर्च करण्यास संचालक मंडळास खंडपीठाकडून मनाई करण्यात आली आहे. शिवाय धोरणात्मक निर्णय घेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. उपनिबंधकांच्या परवानगीने ते आवश्यक तो खर्च करू शकतात, असेही खंडपीठाने निकालात नमूद केले आहे.