संसदेत मनरेगाचा विषय मांडणार, सरकारला धारेवर धरण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 05:49 IST2026-01-29T05:48:31+5:302026-01-29T05:49:35+5:30
Parliament Budget Session: इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक बुधवारी संसद भवन संकुलातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक पार पडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनरेगा रद्द करण्याचा मुद्दा आणि एसआयआरचा मुद्दा जोरदारपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संसदेत मनरेगाचा विषय मांडणार, सरकारला धारेवर धरण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार
नवी दिल्ली - इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक बुधवारी संसद भवन संकुलातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक पार पडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनरेगा रद्द करण्याचा मुद्दा आणि एसआयआरचा मुद्दा जोरदारपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, द्रमुकचे टी. आर. बालू, उद्धवसेनेचे अरविंद सावंत, सपचे जावेद अली खान, राजदचे प्रेमचंद गुप्ता, माकपाचे जॉन ब्रिटास उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विरोधकांच्या रणनीतीवर नेत्यांनी चर्चा केली आणि मनरेगा रद्द करण्याचा मुद्दा मांडण्याची ग्वाही दिली.
काँग्रेस आक्रमक
सरकारने मनरेगावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतरही, संसदेच्या या अधिवेशनात मनरेगा आणि एसआयआरशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी घेतला होता.
हा निर्णय काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या संसदीय रणनीती गटाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे बडे नेते हजर होते.