विरोधी खासदार नेणार राष्ट्रपती भवनावर मोर्चा
By Admin | Updated: March 13, 2015 23:32 IST2015-03-13T23:32:17+5:302015-03-13T23:32:17+5:30
भूसंपादन विधेयकाविरुद्ध मोहीम उघडण्याची योजना विरोधी पक्षाच्या खासदारांनी आखली असून यातील प्रस्तावित दुरुस्तींचा निषेध नोंदविण्याकरिता

विरोधी खासदार नेणार राष्ट्रपती भवनावर मोर्चा
नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकाविरुद्ध मोहीम उघडण्याची योजना विरोधी पक्षाच्या खासदारांनी आखली असून यातील प्रस्तावित दुरुस्तींचा निषेध नोंदविण्याकरिता येत्या मंगळवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय या खासदारांनी घेतला आहे.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, संयुक्त जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिक्ट पार्टी आणि केरळ काँग्रेस (एम) या आठ पक्षांनी आतापर्यंत या मोर्चात सहभागी होण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी येथे दिली. आणखी काही विरोधी पक्षांना मोर्चात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असून संजदचे अध्यक्ष शरद यादव हे यासाठी समन्वयकाची भूमिका वठवित आहेत. संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत एक किमी अंतराच्या या मोर्चात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. हा फक्त खासदारांचा मोर्चा राहणार असला तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यात सामील होऊ शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)